Blogs

  • Home
  • »
  • Blogs
  • »
  • संपूर्ण भुलेखाली गतिमंद मुलांचे दंतोपचार: एक दुर्लक्षित वरदान !

संपूर्ण भुलेखाली गतिमंद मुलांचे दंतोपचार: एक दुर्लक्षित वरदान !

Dr. Anil Patil, MDS Pediatric Dentist, Childrens Dental Clinic, Sangli | 07 Jun 2021Total Views : 1847
संपूर्ण भुलेखाली गतिमंद मुलांचे दंतोपचार: एक दुर्लक्षित वरदान !

Total Dental Treatment of Special (Challenged) Children under General Anesthesia: A Neglect!

संपूर्ण भुलेखाली गतिमंद मुलांचे दंतोपचार: एक दुर्लक्षित वरदान !

डॉ. अनिल पाटील
M.D.S Pediatric Dentistry

गतिमंद मुले म्हणजे ज्या बालकांचा शारीरिक, मानसिक व पर्यायाने बौद्धिक विकास योग्यरीत्या झालेला नाही. उदा. Downs Syndrome, Autism, Mentally Challenged, cerebral palsy, Dyslexia, मूकबधिर मुले इ. गतिमंद मुलांमध्ये छाती व हृदयरोग, एपिलेप्सी, अस्थमा, फाटलेला टाळू, चिकटलेली जीभ, दातांची किड, हिरड्यांचे रोग, मिसिंग टीथ, सप्लीमेंटरी टीथ, मेंदूची अपुरी व अयोग्य वाढ अशा अनेक व्याधी आढळून येतात. या मुलांच्या दुर्लक्षित मुखआरोग्याचे दूरगामी धोके व परिणाम मुलांच्या शारीरिक व बौद्धिक विकासास घातक ठरू शकतात.

दातांच्या बाजूच्या भुलेअंतर्गत वर नमूद केलेल्या व्याधींवर दंतोपचार करताना शारीरिक व बौद्धिक क्षमतेवर नियंत्रण नसणे, अविकसित संवादकौशल्य इ. बाबींमुळे बालक दातांच्या डॉक्टरना पुरेसे सहकार्य करू शकत नाही. तसेच सर्व दातांच्या ट्रीटमेंटसाठी बर्‍याच वेळा यावे लागते. उपचारादरम्यान आरोग्याचे घातक समस्या जसे की रक्‍तदाब वाढणे, रक्‍तातील ऑक्सिजन पुरवठा कमी होणे, फीट येणे उद्‌भवल्यास, त्या नियंत्रित करणेसाठी लागणारी तातडीची उपकरणे, सुविधा (Pulse Oximeter, Oxygen Cylinder, Laryngoscope, Airway, Ventilator etc.) अत्याधुनिक लाईफ सपोर्ट टेक्नॉलॉजी दातांच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध असणेची शक्यता सर्वसाधारणतः कमी असते.

संपूर्ण भुलेखाली दंतोपचार करतेवेळी डेंटल सर्जनसोबत भूलतज्ज्ञ व त्यांची तातडीची उपकरणे उपलब्ध असलेने ही पद्धती तुलनात्मक नियंत्रित व जलद असते. एकाच संपूर्ण भुलेअंतर्गत सर्व दातांची कीड व हिंरड्यांचे आजार संपूर्णतः बरे केले जाऊ शकतात. एकंदरच अशा बालकांचे संपूर्ण भुलेखाली दंतोपचार करणे हे पालक व बालक यांच्यासाठी सुरक्षित व परिणामकारक ठरते.

संपूर्ण भुलेखाली लहान व गतिमंद मुलांचे दंतोपचाराबद्दल जनमानसांत एक अनामिक भीती असते. पण, नियोजनपूर्वक संपूर्ण भुलेखालील गुणवत्तापूर्ण दंतोपचारामुळे सर्व दांताचे एकावेळीच गरजेप्रमाणे रूट कॅनाल, कॅप, सर्जरी व दंतोपचार इ. पूर्ण हातात. या उपचारांमुळे पालकांचे हेलपाटे कमी होतात; तसेच मुलांचे दंत-मुख आरोग्य, चर्वण, पचन, पोषण, वाचा, चेहऱ्याची ठेवण, आत्मविश्‍वास चांगले होतात. अशावेळी संपूर्ण भुलेखाली दंतोपचार एक दैवी देणगी ठरते.

Children’s Dental Clinic, Sangli
मराठा समाज भवन समोर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड,सांगली ४१६४१६
Mob- 9604392925 www.childrendentistsangli.com