Blogs

  • Home
  • »
  • Blogs
  • »
  • Accidental Tooth & Jaw Injuries in Children: Prevention and Treatment

Accidental Tooth & Jaw Injuries in Children: Prevention and Treatment

Dr. Anil Patil; M.D.S. Pediatric Dentist, Childrens Dental Clinic, Sangli | 01 Jun 2021Total Views : 1290
Accidental Tooth & Jaw Injuries in Children: Prevention and Treatment

मुलांमध्ये दात आणि जबड्याच्या अपघाती दुखापती: प्रतिबंध आणि उपचार

सर्व वयोगटासाठी शारीरिकदृष्ट्या सक्रिय जीवनशैली महत्वाची असते. मुख्यतः लहान मुलांमध्ये शारीरिक हालचाली शिकणे, नवीन खेळ शिकणे, क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग घेण्याचे प्रमाण जास्त असते. परंतु अविकसित शारिरीक समतोल तसेच स्नायू आणि हाडांची विकासावस्था, शिस्तीचा आभाव यामुळे मुलांमध्ये शारीरिक दुखापतींचे प्रमाणे जास्त असते. यामधील बऱ्याचशा दुखापती दात, जबडा, ओठ, हिरडी, गाल, तोंड यांच्याशी संबंधित असतात.

पण याविषयीच्या अज्ञानामुळे दातांच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले जाण्याची शक्यता खूप अधिक असते. 2 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांना तोंडाच्या दुखापतीमुळे दुधाचे दात तुटणे, मोडणे किंवा दुधाचा दात पडण्याचा धोका असतो. तर शालेय वयातील मुलांमध्ये कायमस्वरुपी दात तुटणे, मोडणे,पडणे, जबड्याचे फॅक्चर होण्याचे प्रमाण जास्त असते.

मुलांच्या दाताला इजा झाल्यामुळे मुख आरोग्यावर परिणाम होतो, त्याचबरोबर चावणे अन्नपचन, बोलण्यातील उच्चार, हास्य चेहर्‍याची ठेवण, सौंदर्य, मानसिक वाढ, आत्मविश्‍वास यावर देखोल विपरीत परिणाम होतो. दुधाचा किंवा पक्का दात तुटल्यास, मोडल्यास रुट कॅनॉल उपचार करुन सिमेंट भरणे व गरज भासल्यास कॅप बसविणे इ. दंतोपचार योग्य असतात. पण, दुधाचे / पक्के दात हलल्यास (हिरडी वजबड्यातून ढिले झाल्यास),आजुबाजेंच्या दाताचा आधार घेऊन सिमेंट व ऑर्थोडेंटीक वायरच्या सहाय्याने आठ दिवसांसाठी स्प्लिट करत ठेवावे लागतात. यामुळे दात मजबूत व निरोगी होतात. मुलांमध्ये समोरचे पक्के दात Tooth Avulsion म्हणजे हिरडी व जबड्यातून दात निखळून पडल्यास त्वरित दात जबड्यामध्ये पुन:रोपण करुन स्प्लिट केल्यास (नैसर्गिक पक्का) दात वाचू शकतो.

पक्का दात पडल्यानंतर प्रथमदर्शनी साक्षीदार पालक किंवा शालेय शिक्षक असतात. त्यांनी त्वरित मुलास दंतचिकित्सकाकडे पडलेला दात घेऊन देत पुनःरोपण / प्रत्यारोपण उपचार घेणे आवश्यक आहे. अशावेळी, पडलेला पक्का दात पाण्याखाली अलगद धुवून नारळपाणी किंवा दुधामध्ये घालून डेंटिस्टकडे नेल्यास दातांच्या मुळांवरील पेशी जिवंत राहिल्याने दंत पुनःरोपण (दात प्रत्यारोपण) प्रक्रिया यशस्वी होते. तसेच कोरडा दात घेवून गेल्यास वा उपचारास दोन तासांपेक्षा जास्त उशिरा केल्यास दंत पुन:रोपण अयशस्वी होण्याची शक्‍यता वाढते. त्यामुळे पालक, शिक्षकांची दंत इजा-उपचार ज्ञान वाढविण्यासाठी पत्रकारिता, सामाजिक, माध्यमांतून जागरुकता करण्याची आवश्यकता आहे.

त्यापेक्षा दातांना इजा व तत्सम अपघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे महत्वपूर्ण आहे. जसे की कबड्टी, कुस्ती, फुटबॉल, हॉकी, बॉक्सिंग, सायकलिंग करताना माऊथगार्डस्‌, फेसमास्क, हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. विशेषतः माऊथगार्डस्‌ वापरल्याने दात, हिरड्या, जबड्याची हाडे यांना बहुतांशी संरक्षण मिळते. आधुनिक माऊथगार्डसमुळे श्‍वास घेण्यास, बोलण्यास तसेच खेळांतील कौशल्यामध्ये अडचण होत नाही. तसेच तोंडाशी होणाऱ्या दुखापतींचा प्रभाव कमी होतो. दात-जबड्यांच्या दुखापतींना प्रतिबंधात्मक जागरुकता करणे आवश्यक आहे. तसेच शाळा व महाविद्यालवामध्ये क्रीडा संघासाठी टीम डेंटीस्टची संकल्पना रुजवली पाहिजे.